Version 1.1 of the definition has been released. Please help updating it, contribute translations, and help us with the design of logos and buttons to identify free cultural works and licenses!

Definition/Mr

From Definition of Free Cultural Works
Jump to navigation Jump to search

व्याख्या : मुक्त सांस्कृतिक काम

Stable version
This is the stable version 1.1 of the definition. The version number will be updated as the definition develops. The editable version of the definition can be found at Definition/Unstable. See authoring process for more information, and see translations if you want to contribute a version in another language.
  • Appeal for translation improvement: फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग कृत "मुक्त सांस्कृतिक काम" व्याख्येच्या ह्या मराठी अनुवादाची मूळ इंग्रजी व्याख्ये सोबत पडताळणी, तपासणी आणि आकलन सुलभतेसाठी उपयूक्त सुयोग्य सुधारणा करण्यात प्राधान्याने सक्रीय साहाय्य/ सहभाग हवा आहे.

सारांश

ज्यांचा कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही उद्देशासाठी मुक्तपणे अभ्यास करता येईल, उपयोजन[श 1] करता येईल, प्रति काढता येतील आणि/किंवा ज्यात सुधारणा करता येईल अशा तऱ्हेचे काम[टिप 1] किंवा अभिव्यक्ती म्हणजे 'मुक्त सांस्कृतीक काम'[श 2]अशी व्याख्या हा दस्तावेज करतो. या अत्यावश्यक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना दाखविण्याची परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो. जो मुक्त कामाच्या प्रतिष्ठेचे कायदेशीर संरक्षण करतो, तो मुक्त उपयोगाचा परवाना आणि मुक्त काम या दोहोत; ही व्याख्या फरक करते. मात्र खुद्द हीच व्याख्या म्हणजे परवाना नव्हे; तर एखादे काम किंवा एखादा परवाना "मुक्त" म्हणून स्वीकारावा की नाही, हे निश्चित करण्याचे ते केवळ एक साधन आहे.

उपोदघात

कलाकृती, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, विविध प्रकारचे सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती देणारे काम– थोडक्यात: डिजिटल स्वरुपात सादर करता येऊ शकेल अशी कोणतीही गोष्ट – वाढत्या लोकसंख्येस पहावयास मिळणे, ते निर्माण करणे, त्यात सुधारणा करणे, ते प्रकाशित करणे आणि ते वितरीत करणे, हे सामाजिक आणि तंत्रज्ञानात्मक विकासाने शक्य केले आहे. अशा तऱ्हेच्या (काम करण्याच्या) शक्यता अनेक समाजगटांनी हाताळल्या आहेत आणि ज्यांचा पुनःपुन्हा उपयोग करता येईल अशा सामुहिक समृद्धीची निर्मिती केली आहे.

बहुतेक लेखक, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो, त्यांचा दर्जा व्यावसायिक असो अथवा हौशी असो, त्यांना काम सर्वदूर पोहोचेल, ते पुनःपुन्हा वापरता येईल आणि नव्याने निष्पादित(derive) करता येईल, अशा तऱ्हेच्या सर्जक निर्मिती[श 3] करणाऱ्या एका नैसर्गीक व्यवस्थेत अस्सल रुची आहे. काम पुनःपुन्हा वापरणे आणि नव्याने निष्पादित[श 4] करता येणे, हे जितक्या प्रमाणात शक्य होईल, तितक्या कमाल पातळीवर आपल्या संस्कृति समृद्ध होत जातील.

अशी नैसर्गीक व्यवस्था सुविहीतपणे कार्यरत राहण्यासाठी, (कोणत्याही) कामांची निर्मिती[श 5] मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे आणि याबाबतीत आपल्याला अभिप्रेत स्वातंत्र्य म्हणजे:

  • कामाचा उपयोग करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वातंत्र्य असले पाहिजे[श 6]
  • कामाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या उपयोजनाचे स्वातंत्र्य असले पाहिजे
  • कामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या प्रति काढण्यास आणि त्या वितरीत करण्यास ते (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे
  • कामात बदल करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास, आणि ते नवे निष्पादित काम सुद्धा वितरीत करण्यास (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे.

(मुक्त सांस्कृतीक कामात सहभाग देणाऱ्या कोणत्याही) लेखकाने (अशी सुधारणा करणारी) कोणतीही कृती न केल्यास त्यांचे सर्व काम, ज्यामुळे इतर माणसे काय करू शकतात आणि करू शकत नाहीत, हे गांभीर्याने निश्चित करणाऱ्या विद्यमान प्रताधिकार कायद्याखाली येईल.[श 7] ज्यास ‘परवाने’ म्हंटले जाते अशा (येथे सुचवलेल्या प्रमाणे) अनेक कायदेशीर दस्तऐवजांची निवड करून लेखक आपले काम प्रताधिकारमुक्त करू शकतात. लेखकांनी, प्रताधिकारमुक्त परवाना धारणेनुसार, आपले काम केले असले तरी, त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे (त्या कामावरील) अधिकार संपुष्टात आले; तर ते (अबाधित राहून) वरील यादीत नमूद केल्यानुसारचे स्वातंत्र्य (त्यांनी) कुणालाही दिले आहे, असा त्याचा अर्थ होतो.

महत्वाचे हे आहे की, "मुक्त काम असल्याचा दावा करणारे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम" व्यवहारतः आणि कोणत्याही जोखीमेशिवाय उपरोल्लेखित स्वातंत्र्य देते. आणि म्हणून (येथून पुढे), (मुक्त) परवान्यांच्या आणि लेखक कामांच्या स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या आम्ही देत आहोत.

मुक्त सांस्कृतीक कामाची ओळख

ही मुक्त सांस्कृतिक कामांची व्याख्या आहे आणि जेंव्हा तुम्ही तुमच्या कामाचे वर्णन कराल तेंव्हा “मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्येत स्पष्ट केल्यानुसार हे (प्रताधिकार)मुक्त परवाना देणारे काम आहे” असा संदर्भ तुम्ही द्यावा, असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देत आहोत. जर तुम्हाला “मुक्त सांस्कृतिक काम”[श 8] हा शब्द मान्य नसेल तर तुम्ही “मुक्त मजकुर”[श 9] असा सामान्य शब्दप्रयोग करू शकता किंवा अधिक विशिष्ट संदर्भात असे समान मुक्ताधिकार व्यक्त करणाऱ्या विद्यमान चळवळीतील एकाचा संदर्भ देऊ शकता. या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या मुक्त सांस्कृतिक कामाचे मानचिन्ह आणि बटन यांचा वापर करण्याचे प्रोत्साहनही आम्ही तुम्हाला देत आहोत.

तथापि कृपया हे लक्षात घ्या की अशा प्रकारचे तादात्मीकरण[श 10]हे काही या व्याख्येत वर्णन केल्यानुसारचे हक्क बहाल करीत नाही; तुमचे काम हे यथार्थतेने स्वतंत्र होण्याकरिता ते मुक्त संस्कृती परवान्यांपैकी एक परवाना वापरला पाहिजे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील असले पाहिजे.

मात्र, स्वातंत्र्याची व्याख्या सुस्पष्टपणे संप्रेषित[श 11] न करणारे ‘खुला मजकुर/आशय[श 12] आणि “खुली उपलब्धता/प्रवेश[श 13] सारखे शब्दप्रयोग मुक्त सांस्कृतिक कामांचा परिचय देण्याकरिता वापरण्यास आम्ही प्रोत्साहन देत नाही. (कारण) असे शब्दप्रयोग विद्यमान कायद्यांनुसार (प्रताधिकारमुक्त) न ठरता, “कमी बंधनकारक’’ शब्दांच्या अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या आशयासाठी किंवा केवळ “आंतरजालावर उपलब्ध” असणाऱ्या कामाचा निर्देश करण्यासाठी म्हणून वापरले जातात.

मुक्त सांस्कृतीक परवान्यांची व्याख्या

परवाने हे कायदेशीर साधने आहेत की ज्यांच्या मार्फत निश्चित कायदेशीर हक्कांचा मालक (आपल्या) या हक्कांचे हस्तांतरण तिसऱ्या पक्षाला करू शकतो. मुक्त सांस्कृतिक परवाने (कोणाचेही) कोणतेही हक्क हिरावून घेत नाही – ते स्वीकारावेत की नाही, हे ऐच्छिक असते, आणि एकदा स्वीकारले तर, ते केवळ प्रताधिकारहक्क कायदाच देत नाही, अशी (व्यापक) स्वातंत्र्ये ते (परवाने) बहाल करतात. स्वीकारले गेल्यानंतर प्रताधिकारहक्क कायद्यातील विद्यमान अपवाद कमीही करीत नाहीत अथवा त्यांना मर्यादाही घालत नाहीत.

अनिवार्य स्वातंत्र्य

या व्याखेत स्पष्ट केल्यानुसार (परवाना) “मुक्त” आहे, हे ओळखण्याची खुण, म्हणजे त्या परवान्याने खालिल स्वातंत्र्ये कोणतीही मर्यादा न घालता बहाल केली पाहिजेत :

  • ते काम वापरण्याचे आणि सादर करण्याचे स्वातंत्र्य : परवानाधारकास त्या कामाचा कसाही उपयोग करण्यास, - खासगी वा सार्वजनिक, उपयोग करण्यास मुभा असली पाहिजे. जेथे जेथे अशा प्रकारच्या कामाचा संदर्भ येईल तिथे तिथे ही कामे सादर करणे किंवा त्यांचे अर्थनिर्णयन करणे, यासारख्या निष्पादित उपयोगाचा ( म्हणजे त्या “संबंधित हक्कांचा”) समावेश या स्वातंत्र्यात निहित असला पाहिजे.
  • कामाच्या अभ्यासाचे स्वातंत्र्य आणि माहितीचे उपयोजन करण्याचे स्वातंत्र्य: कामाची चिकित्सा करणे आणि कामापासून लाभलेल्या ज्ञानाचा कोणत्याही मार्गाने वापर करण्यास परवानाधारकास परवानगी असली पाहिजे.
  • (कामाच्या) प्रतिंचे पुनर्वितरण करण्याचे स्वातंत्र्य : एखाद्या मोठ्या कामाचा हिस्सा म्हणून, त्या कामाचा साठा करून ठेवण्याचा भाग म्हणून किंवा (हे हेतू न ठेवता) अगदी स्वतंत्रपणे सुद्धा या प्रतिंची विक्री होऊ शकते, देवाणघेवाण होऊ शकते किंवा त्या मोफतही दिल्या जाऊ शकतात. खेरीज किती प्रमाणात माहितीच्या प्रती केल्या जाऊ शकतील, त्यावर मर्यादा असणार नाही. ही माहिती कोण प्रतिमुद्रित करेल किंवा कुठे या माहितीचे प्रतिमुद्रण होईल यावरही मर्यादा असणार नाही.
  • निष्पादित कामाचे वितरण करण्याचे बंधन : येथील कामात सुधारणा करण्याची क्षमता प्रत्येकास प्रदान करता यावी, या करिता, (एखाद्याकडे सुधारणा करण्याची इच्छा आणि हेतू असो वा नसो पण त्या ) सुधारित आवृत्तीचे (किंवा भौतिक कामाचे, म्हणजे मूळ कामावर बेतलेले कोणत्याही मार्गाने निष्पादित होणारे काम), वितरण होण्यावर परवाना बंधन घालू शकणार नाही. तथापि उपरोल्लेखित अनिवार्य स्वातंत्र्यांचे रक्षण करण्यासाठी किंवा लेखकाच्या सहभागाचे रक्षण करण्यासाठी काही बंधने मात्र लागू राहतील. (खाली पाहा)

परवानगी असलेले निर्बंध

कामाच्या प्रतिंच्या वितरणावर अथवा उपयोगावर असलेली सर्व बंधने काही अनिवार्य स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत. खास करून प्रताधिकारच्या श्रेय देणे, परस्परावलंबी सहकार्य करणे (उदाहरणार्थ "copyleft": मराठी शब्द सुचवा) आणि अनिवार्य स्वातंत्र्याचे संरक्षण करणे, यासाठी काही बंधने ही परवानगीयोग्य बंधने म्हणून स्वीकारली गेली आहेत.

मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्या

‘काम’ (प्रताधिकार) मुक्त म्हणून स्वीकारता यावे, यासाठी (येथे होणारे) कोणतेही काम मुक्त सांस्कृतिक परवाना अंतर्गत समाविष्ट असावे किंवा त्याचा कायदेशीर दर्जा हा वर स्पष्ट केल्यानुसारची नेमकी तीच अनिवार्य स्वातंत्र्ये बहाल करणारा असावा. अर्थात ही काही पुरेशी अट नाही. एखादे विशिष्ट काम क्वचित अमुक्तही असू शकेल की जे वेगळ्या अर्थाने अनिवार्य स्वातंत्र्यांवर बंधने टाकूही शकेल. (येथे होणारे) कोणतेही काम मुक्त म्हणून स्वीकारण्यासाठी या काही अधिकच्या अटी आहेत (एवढेच):

  • साधनाच्या माहितीची उपलब्धता : अंतिम स्वरूपाचे येथील कोणतेही काम, हे प्राप्त माहितीचे एकत्रीकरण करणे किंवा साधनीभूत फाईल किंवा फाईल्स यांच्यावर (संपादकीय) प्रकिया करून होत असल्याने, त्या माहितीचे मूलस्त्रोत असणारे मार्ग आणि ती संबंधित माहिती, ही वरील अटींनुसार त्या कामाच्या सोबतच उपलब्ध (झालेली) असली पाहिजे. एखादी सांगीतिक रचना, थ्री डी दृश्यात वापरल्या गेलेल्या प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकाशनातील माहिती, संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत किंवा अशी कोणतीही माहिती ही मूलस्रोताताबरोबरच उपलब्ध असली पाहिजे.
  • मुक्त साच्यांचा उपयोग : उपलब्ध करून देण्यात येणारी माहिती जर डिजिटल फायलीच्या साच्यात असेल तर त्या फायली जोपर्यंत त्या पेटंट आरक्षित तंत्रज्ञानास जगभरात अमर्याद आणि बिनापरतीच्या मानधन देण्यातून मुक्त केले असल्याच्या बोलीवर राहील, तोपर्यंत त्या फायली पेटंटने आरक्षित केलेल्या नसाव्यात,
  • तांत्रिक बंधने नको: येथील कोणतेही काम अशा साच्यात उपलब्ध असावे की जेणेकरून वर उल्लेख केलेली स्वातंत्र्य मर्यादित करणारी कोणतीही तंत्रज्ञानात्मक क्लृप्ती वापरावी लागणार नाही.
  • इतर बंधने अथवा मर्यादा नाहीत: येथील काम (पेटंट, करारमदार इत्यादी) कायदेशीर बंधनात अडकलेले नसावे किंवा मर्यादा घातलेले (जसे की खासगीपणाचा हक्क) नसावे की ज्यामुळे उपरोल्लेखित स्वातंत्र्यात अडसर निर्माण होईल. येथील एखादे काम, प्रताधिकारास अस्तित्वात असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) जरी त्या प्रताधिकारास नि:संदिग्धपणे मुक्त करणाऱ्या काही हिश्यामुळे संपूर्ण काम मुक्त करीत असेल; तरी त्यांचा वापर करून घेऊ शकेल.

वेगळ्या शब्दात, कामाचा वापरकर्ता (पुरुष किंवा स्त्री अथवा अन्य कुणी माणूस) त्याचा किंवा तिचा कायदेशीर अथवा व्यावहातः आपली मूलभूत स्वातंत्र्ये वापरू शकणार नाही, तेंव्हा असे काम “मुक्त” म्हणून स्वीकारले जाऊ शकणार नाही किंवा “मुक्त” म्हणता येणार नाही.

दुसऱ्या शब्दात, असे कोणतेही काम, जे एखाद्या कामाचा वापरकर्ता, त्याचे अथवा तिचे मुलभूत स्वातंत्र्ये कायदेशीरदृष्ट्या अथवा प्रत्यक्ष व्यवहारात आणू शकणार नाही, त्या कामास 'मुक्त' म्हणता येणार नाही.

अधिक वाचन

  • पाहा Licenses (एकएकट्या परवान्यांबद्दल चर्चा आणि ते विशीष्ट परवाने या व्याख्येच्या कसोटीस उतरतात अथवा नाही.
  • पाहा History (या व्याख्येची पार्श्वभूमी आणि acknowledgments-मराठी शब्द सुचवा- जाणून घेण्यासाठी).
  • पाहा FAQ (नित्याच्या निवडक प्रश्नोत्तरांसाठी).
  • पाहा Portal:Index (मुक्त सांस्कृतिक कामा बद्दल विशीष्ट विषयवार पानांसाठी).

आवृत्ती

सदर व्याख्येस सुचविल्या गेलेल्या बदलांना ( विहीत लेखन प्रक्रियेतून, थेट किंवा मतदान पद्धतीने साध्य) सहमती जशी जशी प्राप्त होईल तस तसे व्याख्येच्या नवीन आवृत्ती प्रकाशित केल्या जातील.

साहाय्य

येथून खालील भाग मूळ व्याख्या दस्तएवजाचा भाग नाही, केवळ ढोबळ माहिती आणि साहाय्यार्थ , उत्तरदायकत्वास नकार लागू.

(विशेष) टिप

शब्दार्थ टीप

  1. English:applied → मराठी:उपयोजन
  2. English:"Free Cultural Works" → मराठी:'मुक्त सांस्कृतीक काम'
  3. English:"creative ways" → मराठी:'सर्जक निर्मिती'
  4. English:"derived Work" → मराठी:'निष्पादित काम'
  5. works of authorship should be free → (कोणत्याही) कामांची निर्मिती (मालकी-अधिकार मात्र) मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे
  6. enjoy the benefits of using it → उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे
  7. पर्यायी अनुवाद: If authors do not take action, their works are covered by existing copyright laws, which severely limit what others can and cannot do. →जर लेखकांनी (लेखन मुक्त करण्याची कृती केली नाही तर, त्यांचे तसे काम सध्या लागू प्रताधिकार कायद्याने सुरक्षीत होते, यामुळे इतर लोक (अशा प्रताधिकारीत कामांबाबत) काय करू शकतात आणि काय नाही यावर कठोर मर्यादा येतात.
  8. English:"Free Cultural Works" → मराठी:'मुक्त सांस्कृतीक काम'
  9. English:"Free content" → मराठी:'मुक्त मजकुर'
  10. English:identification → मराठी:तादात्मीकरण/ओळख/परिचय
  11. English:convey → मराठी:संप्रेषित/व्यक्त
  12. English:"Free content" → मराठी:'मुक्त मजकुर'
  13. English:"Open Access" → मराठी:'खुली उपलब्धता'

इंग्रजी मराठी संज्ञावली glossary of terms used

  • freely - मुक्तपणे
  • expressions - अभिव्यक्ती
  • document - दस्तावेज

इंग्रजी मराठी संज्ञावली additional glossary of terms used contd

  • Summary - सारांश
  • Preamble - उपोदघात
  • ecosystem -नैसर्गीक व्यवस्था
  • graceful functioning - सुविहीतपणे कार्यरत
  • copyright - प्रताधिकार